आकाशाकडे लावूनि डोळे पावसाची वाट पाहिली |
पावसाची ठेवूनि आस पदरी फक्त निराशा आली ||
पाण्यासाठी वणवण करत मैलो-मैली फिरलो |
कळशीभर पाणी न मिळता माघारी आलो ||
गुरांसाठी नाही चारा, पक्ष्यां साठी नाही पाणी |
सांगून सांगून थकलो सरकारला आमुची रडगा णी ||
घोटभर पाण्यासाठी आम्ही जातो ये थे मरून |
शहरात असता पाणी वापरावे ते जपून ||
सगळीकडे आज दुष्काळाची परीस्थि ती झाली |
डोळ्यातील अश्रू पाणी म्हणून पि ण्याची वेळ आली ||
पाण्याकडे डोळे आणि डोळ्यात आमु च्या पाणी |
जमीन सुकली, ओठही सुकले आता उरले ना काही ||
आता उरले ना काही......
----- नम्रता हेमंत खैरे

Good 1! 😀😊👍
ReplyDeletebest
ReplyDeletethank u so much subhash..... :)
Delete