Seeing the worsened Jammu-Kashmir floods, I wondered if water expresses his own thoughts.....
जम्मू-काश्मीर चा प्रलय पाहता, जर आपण पाण्याच्या जागी विचार ठेऊन त्याचे म्हणणे ऐकले तर …… हा एक छोटासा प्रयत्न…
पाण्याचे दु: ख जर त्याने स्वतः व्यक्त केले तर……
जल, नीर, तोय, उदक, रस, पाणी, अशी अनेक नावे दिलीत तुम्ही मला… इतकंच काय जीवन असे ही संबोधले तुम्ही मला … आणि खऱ्या अर्थाने मी ते सार्थक करण्याचा प्रयत्न केला आणि करतोय……
जल, नीर, तोय, उदक, रस, पाणी, अशी अनेक नावे दिलीत तुम्ही मला… इतकंच काय जीवन असे ही संबोधले तुम्ही मला … आणि खऱ्या अर्थाने मी ते सार्थक करण्याचा प्रयत्न केला आणि करतोय……
घशाची कोरड दूर केली…थकलेल्या वाटसरूला मी आराम दिला…उन्हाळ्यात गारवा दिला..
तहानलेल्याला तृप्त केले … लहानांच्या चेहऱ्यावर हास्य आणले, आजारपणातून सावरले, आयुष्य वाढवले.....
प्रत्येकला मी नेहमी आनंद दिला…
पावसाच्या रुपात बरसून आलो… नाले, डबके, तलाव, सरोवर, नदी, समुद्र, महासागर या अनेक रुपात भरून आलो… नळावाटे घराघरात पोहचलो… कधी नारळात भरून आलो… प्रत्येक पेशी,स्नायू, अवयवाला आवश्यक ठरलो, शरीराचे तापमान राखण्याकरिता घामावाटे बाहेर पडलो, केवळ उत्साही नाही आरोग्यवर्धक ठरलो….
नाही सांगत माझी महती… नाही करत माझे कवतुक… महत्व पटवण्यासाठी थोडा मी उत्सुक…
होतेय माझ्या जीवाची तळमळ, ह्याची जाणीव करण्यासाठी ही थोडी धडपड….
निसर्गाने भरभरून दिले… सर्व सुख-सोयी पदरात भरले… वन्य, पशु, पक्षी निर्माण केले…. जैववैविध्य जपले….
अनेक गोष्टींचा तुम्ही शोध लावला…. उपलब्ध संसाधनांचा वापर तुम्ही केला ….
तुम्ही सुख, समृद्धी आणली, जीवनात भरभराट केली…. तुम्ही खूप प्रगती केली, निसर्गावर मात केली…
पण…….
पण अलीकडे चित्र बदलले…….
जंगलांची ऱ्हास झाली, जैवविविधता संपुष्टात आली, उल्लासित करणारी हिरवळ नष्ट झाली, जलचक्रात बिघाड झाली, नैसर्गिक साधने संपायला आली… तुमचीच प्रगती अधोगती ठरली….
माझ्या घराला तुम्ही नष्ट केले… माझ्या काळीजाला तुम्ही ईजा केली… माझ्या जीवाला तुम्ही वेठीस धरले…. तरी तुम्ही सुधारण्याची मी वाट पाहिली…
पण परिस्थिती हाताबाहेर गेली…. माझी सहनशक्ती संपुष्टात आली….
आणि……….
आणि माझे अश्रू बरसले…. कधी मुसळधार पावसाच्या रुपात बाहेर आले… कधी उंच त्सुनामी वाटे कोसळले….
कधी मी अश्रू लपवले आणि दुष्काळा वाटे तुम्ही सहन केले….
मग ढगफुटी, दरड कोसळणे, बर्फवृष्टीची हळुवार, महापूर, कोरड दुष्काळ, चक्रीवादळ, पाणी टंचाई, प्रलय ह्या माझ्याच वेदनांची झलक….
तुम्ही जंगलतोड केले, सिमेंटचे जंगले उभारले. मी त्यालाच ह्या वेदनांमार्फत नष्ट केले….
लातूरचा दुष्काळ, २६/१२ ची त्सुनामी, कतरिना असो वा फिलिपिन चक्रीवादळ, उत्तराखंड ढगफुटी, माळीण दरड कोसळ, किंवा अलीकडचे जम्मू-काश्मीर चा महापूर हे सगळे मीच घडवून आणले….
हो, मीच… तुम्ही ज्याला जीवन म्हणता…. त्यानेच तुमच्या जीवनाचे हाल केले….
पण…. मला हे करण्यात आनंद नाही…. उलट वाईटच वाटते….
ही वसुंधरा माझी जननी आहे…. आणि माझ्या आईचे असे होणारे हाल-अपेष्टा मला सहन होणार नाहीत…. हे तर माझे सौम्य रूप….
तुम्ही वेळेत सावरलात तर माझ्या महरौद्र महाप्रलयापासून वाचाल आणि आनंदाने जगाल…
मी तर असे ही ऐकले आहे तुमचे तिसरे महायुद्ध माझ्यावरून होणार आहे…. नका हो, मी ते कारण न बनू दे….
महायुद्ध जर आपण महायुतीत बदलून आणले तर.....……
मी आहेच तुमचे जीवन…. आणि तुम्हीच माझे जीवन……
तुम्ही माझ्या घराला नष्ट करणं थांबवा आणि मी देखील थांबिन ….


True words.
ReplyDelete