रुईया कॉलेज मध्ये असताना एका कविते स्पर्धेत भाग घेतलेला..
तेव्हा आपण जी चिट्ठी निवडू त्यात असणारे 2 शब्द कवितेत आले पाहिजे असा नियम होता. मला आलेले शब्द होते पौर्णिमेचा चंद्र आणि ग्रहण, त्या प्रसंगी स्पर्धेत सुचलेली ही कविता.
माझ्या आयुष्याला जणू ग्रहणच लागलंय
कधी असतो मी तो तर कधी होते ती
आयुष्यच माझं संपलंय तो-ती च्या चक्रव्यूहात
उमजेनास झालंय नक्की आहे तरी कोण मी?
कधी असतो मी पुल्लिंगी तर कधी मी स्त्रीलिंगी
हे सगळं कमी की काय म्हणून ठरवलं नपुसकलिंगी
एवढंच काय माझ्यासाठी आठवड्याचा एक दिवस ही ठेवला
पाची वापरून वाजणाऱ्या टाळ्यांचा प्रसार ही केला
प्रत्येक वेळी, प्रत्येक ठिकाणी माझा दुरावास केला
पौर्णिमेच्या शुभ्र चंद्राला काळा ग्रहण लागला
सगळीकडे प्रत्येकाने माझी नाचक्की केली
6 नंबर असल्याची नेम प्लेट माझ्या माथी लावली
नोकरी करायची म्हटली तरी तिथून माझी हकालपट्टी केली
2 रुपये द्या अशी भीक मागण्याची वेळ माझ्यावर आली
सगळ्यांसारखे दोन हात, दोन पाय देवाने मला ही दिले
मग का म्हणून पौर्णिमेच्या चंद्राला ग्रहण असे लागले?
का म्हणून पौर्णिमेच्या चंद्राला ग्रहण असे लागले?
नम्रता खैरे
No comments:
Post a Comment