Everyday we are hearing cases of suicides by teenagers, addicted to #bluewhalegame.. Just tried what would be one of the reasons for a 15 year boy to end up his life..
----- Namrata Khaire
" Mummy, papa , I am sorry.. पण मला हे करावं लागेल. मी सुरू केलेला हा खेळ मला संपवावा लागेल.. ते बघत आहेत मला मम्मा, I am sorry.. I am really sorry....
पण माझी पण चूक नाही मम्मा, तुम्ही दोघं ऑफिस मधे जायचा, संध्याकाळी यायचा. मी शाळेतून यायचो दुपारी, खरंतर घरी यायला नकोसं वाटायचं. भीती वाटायची, कसं तरी व्हायचं..
म्हणून काहीना काही करत मी उशिरा घरी यायचो.. कधी मित्रांबरोबर खेळायचो, कधी बाईंना पुस्तकं लावायला मदत करायचो, कधी नाक्यावरच्या बसस्टॉप वर नुसतंच बसायचो, कधी झाडाची पाने तोडून काहीतरी सजवायचो, तर कधी फक्त रस्यावरचे दगड गोळा करायचो..
भर उन्हात पाठीवर इतकं ओझं उचलून जमेल तिथे हिंडायचो, बागडायचो, फिरायचो. पण पाय थकले की घरी यायचो.....
घरी कुणीच नसायचं.. खूप शांतता असायची.. मी काही बोललो की माझाच आवाज घुमायचा.. असं वाटायचं कुणी आहे, खूप वाटायची गं मम्मा....
असं वाटायचं की ती शांतता मला खाऊन टाकेल आणि तो आवाजही मला दाबून टाकेल..
मला तुमची खूप आठवण यायची, गरज वाटायची.. मी डॅडू ला फोन लावायचो, पण मिटिंग बिटिंग मध्ये असायचो तो.. तू पण फोन नाही उचलायचीस, उचललास तर काम आहे सांगायचीस.. बाईंनी इतका सारा दिलेला होमवर्क करून घ्यायला पण तुम्ही नसायचा..
शाळेला पण आम्ही रोबोट वाटतो का ग? Project book , class book, home book, text book, एका subject चे किती books.. सगळं उचलायचं एवढुश्या बॅग मध्ये, आम्ही पण एवढूसे, आणि जायचं शाळेत.. प्रत्येक subject चा किती होमवर्क, नाही केला तर punishment, टीचर किती बोलायची, रागवायची, मारायची.... मला नाही जायचं शाळेत..
त्या दिवशी मी computer चालू केला. असंच काहीतरी search करताना मला Blue Whale game दिसला. pokemon Go सारखाच interesting आणि नवीन वाटला.. खेळलो काही दिवस. Curiosity वाढली, ते नाही का म्हणत, virtual काय, reality काय तसं काहीतरी होतं.. रोज काय challenge असेल, ह्याची curiosity वाढत गेली, म्हणून शाळा सुटली की लगेच पळत घरी यायचो.. adventurous वाटत होतं सगळं.. शाळेपासून, भीतीपासून एकदम tension free वाटत होतं.....
एक दिवशी तो blue whale मासा हातावर काढायचा होता. पेन्सिल पेन ने नाही, तर चाकू, blade सारख्या एखाद्या धारधार वस्तूने.. मला नव्हतं करायचं तसं, पण ते game वाले बघतात, आणि game असा मधेच सोडता येत नाही ना, म्हणून कसंतरी केलं, mumma, daddu, खूप दुखलं तेव्हा, खूप रक्त आलं, खूप रडलो मी.....
पण mummy, daddy तुमचं लक्ष नाही गेलं का हो माझ्या हातावर? इतके busy कसे हो तुम्ही? मी दिवसभर काय करतो, इंटरनेट वर काय बघतो, शाळेत जातो का, test मध्ये किती marks आणतो, अभ्यास करतो की copy करून पास होतो हे कधी पाहिलंत का? खेळतो का, खेळताना मला कुठे लागतं का, दुखतं का, एवढा होमवर्क मी कसा करतो कधीतरी बघा ना..
Next year तर माझी दहावी आहे, कोणत्या क्लास ला पाठवायचं, 85 % च्या वर आणायचं, नंतर science आणि मग engineering ला पाठवायचं हे सगळं तुम्ही आधीच ठरवलं. पण क्लास ला जाऊन मला 85-90% मिळणार का? तुम्ही पण थोडंसं लक्ष द्या ना.. थोडासा time द्या ना......
एखादी सुट्टी घेऊन कधी बागेत फिरायला जाऊया, कधी एकत्र पाणी पुरी खाऊया, कधीतरी मज्जा पण करूया ना..
मला नकोय pokemon ची बॅग, chota bheem ची bottle, किंवा ती remote control car, computer नको, इतका मोठा TV पण नको आणि हा game पण नको.. मला फक्त तुम्ही हवे आहात.. फक्त तुम्ही...
आज Game चा last day आहे.. मला नाही खेळायचाय game, पण मला भीती वाटतेय त्यांची.. ते बघत आहेत मला, ते बघत आहेत..
मला game संपवावाच लागेल.. त्यासाठी मला स्वतःला संपवावं लागेल. I am sorry mummy, I am sorry daddy..... I am sorry ...... love you both
तुमचाच........