ती व्यक्ती ------
आयुष्याच्या वळणावर एकदा तरी समस्या येतेच |
आणि ती आली की माणसाला ती Depression मध्ये नेतेच ||
आशा वेळी प्रत्येकाला वाटतं कु णीतरी आपल्या बरोबर असावं |
त्या व्यक्तीशी आपण आपल हे दुः ख share करावं ||
हे सगळं सांगताना अलगदपणे आपल्या डोळ्यात पाणी यावं |
आणि हळूच आपण त्या व्यक्तीच्या मिठीत शिरावं ||
आपल्याला रडताना बघून त्या व् यक्तीनेही रडावं |
मग त्या व्यक्तीसाठी आपलं दुःख लपवून आपण खुदकन हसावं ||
त्या व्यक्तीशी बोलून अर्धा problem solve झाला असं वाटावं |
त्या व्यक्तीने ही मी असताना घा बरू नको असं आश्वासन द्यावं ||
आपल्यासाठी त्या व्यक्तीने वाटे ल ते करावं |
आणि आपण ही त्या व्यक्तीच्या सहवासात सतत रहावं ||
प्रत्येकाला वाटतं आपलं हे स्वप्न कधीतरी खरं व्हावं |
आयुष्याच्या एखाद्या वाटेवर कु णीतरी असं भेटावं ||
ही ईच्छा लवकरच पूर्ण होईल असं कधीतरी देवाने ही सांगवं |
आपलं आयुष्य जगत असताना त्या व् यक्तीचं हळूच आगमन व्हावं ||
शेवट पर्यंत त्या व्यक्तीने आपल्या बरोबरच असावं |
कोणतंही संकट आलं तरी आपल्याला मदत करत रहावं ||
प्रत्येकाला वाटतं आपल्या आयुष् यात असं कुणीतरी खास असावं |
त्या व्यक्ती बरोबर आपण हसत हसत जगावं आणि हसत हसतच मरावं | |
---- नम्रता खैरे

No comments:
Post a Comment