खरे जीवन
एकदा प्रश्न पडला काय आहे माझे जीवन
प्रश्नाचे उत्तर मिळण्यासाठी देवाला गेले शरण
देवाने सांगितले,
जिथे होईल तुझे आयुष्य आनंदवन
तेच असेल तुझे खरे जीवन....
जिथे होईल प्रेमाचे सिंचन
जिथे जमतील आयुष्याचे ऋणानुबंधन
जिथे असेल बहरलेल्या प्रेमाचे वृंदावन
तेच असेल तुझे खरे जीवन....
जिथे भिडले समुद्राला गगन
जिथे संपूर्ण आयुष्य करशील अर्पण
जिथे असेल गर्द छायेतील सुंदरबन
तेच असेल तुझे खरे जीवन....
जिथे अर्पिले जाईल तन, मन, धन
जिथे हवेहवेसे वाटेल मरण
जिथे समर्पित करशील सारे जीवन
तेच असेल तुझे खरे जीवन....
देवाने घातलेलं हे खूप मोठं कोडं होतं
पण प्रश्नाचं उत्तर शोधणं गरजेचं होतं
मग,
खूप विचार केला, खूप विहार केला
खूप मनन केले, खूप चिंतन केले
ध्यानस्थ गेले, प्राणायाम केले
पुस्तकं वाचली, google search केले
दही दिशा फिरले, अनेक लोकांना भेटले
पण ह्या प्रश्नाचं उत्तर न मिळे
अहो,
Google वर उत्तर नाही पाहून प्रश्नंच पडे
समजेनासे झाले कसे सोडवू देवाचे कोडे
पुन्हा देवाचे नमन केले, परत त्याला शरण गेले
शेवटी सोप्या शब्दात त्याने कसेबसे सांगितले
तो म्हणाला,
अगं, एवढं सगळं करण्याची काय होती गरज
स्वतःच्या आत डोकावून तरी बघ....
खूप वेगळं आणि सुंदर दिसेल हे जग
जीवनाचं खरं उद्धिष्ट कळेल तुला मग....
आजूबाजूला फिरकून तरी बघ
डोळ्यातील चित्र स्वछ करून तरी बघ.....
अजूनही प्रश्नार्थक चिन्ह होतं चेहऱ्यावर
पाहून मला, देव हसला माझ्यावर....
मग म्हणाला,
अगं लोकांचं हसणं खिदळनं
लहानांचं खेळणं बागडणं
चिंब पावसात भिजणं आणि भिजवणं
हेच तुझे खरे जीवन..
वेळेवर गरजूला मदत करणं
जबाबदाऱ्या सांभाळून सर्व नाती जपणं
स्वतःबरोबर दुसऱ्यांची उन्नती करणं
हेच तुझे खरे जीवन...
न्याय करणं, अन्यायाला रोखणं
संकटांना हसत हसत सामोरं जाणं
दुसऱ्याला अन स्वतःला ओळखणं
हेच तुझे खरे जीवन....
आपलं ज्ञान दुसऱ्याबरोबर वाटणं
दुसऱ्याच्या दुःखात शामिल होणं
दुसऱ्या च्या आनंदात आनंद मानणं
हेच तुझे खरे जीवन......
नम्रता खैरे
No comments:
Post a Comment