Tuesday, October 31, 2017

जगण्याची उमेद..



जगण्याची उमेद

नको नकोसं झालं आहे हे आयुष्य आता |
हरवून गेल्या आहेत जगण्याची उमेद देणाऱ्या त्या वाटा ||

जीवनाचे हसरे, आनंदाचे क्षणच आपण कुठेतरी हरवून बसलोय |
कधी जिंकलो असताना देखील वाटतंय आपण  कायमचं हरलोय ||

हजारो लोक बाजूला असतानाही वाटतंय आपण एकटेच आहोत |
आयुष्याची रडगाणी कुणाला सांगायची हिम्मत मात्र नाही होत ||

विश्वासाने सगळं सांगून त्यांना प्रत्येकाने विश्वासघातच केला |
यापुढे आपलं कुणी नाही असा अनुभव मात्र आला ||

पडलो, हरलो, रडलो, एकटे पडलो, खचून गेलो कायमचे |
समोरच्याची चाल न बघता सगळे पत्ते उघडले जीवनाचे |लो |

त्यांचा कधी आपल्यावर विश्वास बसणार नाही, मग काय आहे ह्या जीवनाचा उपयोग |
मानसिक त्रासापेक्षाही खूप बरा आहे cancer सारखा भयानक रोग ||

एका छपराखाली राहून देखील आपलं अस्तित्व काय आहे |
जिवंत असतानाही मेलेल्या माणसासारखं जगणं मात्र आहे ||

म्हणूनच कधीतरी वाटतं डोकं आपटून फोडून टाकावा हा माथा |
किंवा जीवघेणा अपघात व्हावा रस्त्यावरून जाता जाता ||

railway track वर उभं राहून एकाद्या train ने उडवून टाकावं |
sea link वरून उडी  मारून पाण्यामध्ये बुडून जावं ||

कळतंच नाही की आता कशासाठी अन कुणासाठी जगायचंय |
देवाकडे पहिली इच्छा हीच की मला लवकरच मरायचंय |

नको नकोसं झालं आहे हे आयुष्य आता |
हरवून गेल्या कायमच्या, जगण्याची उमेद देणाऱ्या त्या वाटा ||

No comments:

Post a Comment